NMMC | भाजपाच्या चार नगरसेवकांचा राजीनामा, गणेश नाईकांना धक्का | ABP Majha
विधानसभेला भाजपात गेलेल्या नवी मुंबईतील 4 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलाय.
त्यामुळे अवघ्या २ महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांना हा मोठा धक्का बसलाय. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रीका गवळी, संगीता वास्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये.
एकीकडे महाविकासआघाडीनं मोट बांधलेली असताना दुसरीकडे भाजपला मात्र गळती लागली आहे. प्रभागातील कामं भाजप करत नसल्याची तक्रार करत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं नगरसेवक सतीश कुलकर्णींनी म्हटलंय.