Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील 8 पैकी 6 अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai Crime : नवी मुंबईतील 8 पैकी 6 अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. सात जणांपैकी पाच मुलांचा शोध लागला असून दोघांचा सुरू आहे. हे सर्व गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती अल्पवयीन आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेला १२ वर्षीय मुलगा प्रज्वल पाटील हा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापडला आहे. याच भागातून बेपत्ता झालेला आयान खान सुद्धा सापडला आहे. तर रबाळे पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेली १३ वर्षीय अनुष्का राजभर ही मुलगी ऐरोलीत सापडली. कामोठे परिसरातून गायब झालेली अंतरा विचारे गुजरातमध्ये सापडलीय. दरम्यान रबाळे आणि पनवेलमधून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा तपास सुरु आहे.