नवी मुंबईकरांना थर्टी फस्ट सेलिब्रेशन महागात पडणार, सोसायटीत पार्टी केल्यास गुन्हे दाखल होणार
थर्टीफस्टनिमित्त सोसायटीच्या आवारात, गच्चीत नाचगाणं, दंगा करणं, जोरदार सेलिब्रेशन करणं महागात पडू शकतं.. कारण जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन केलंत तर पोलीस कारवाई तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगरपालिका आणि पोलीसांकडून निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दारु पिऊन धिंगाणा घालणं, मद्यपान करुन रस्त्यांवर गाडीने हॉर्न वाजवत राऊंड मारताना पोलिसांच्या तावडीत जर तुम्ही सापडलात तर थेट सरत्यावर्षात आणि येत्या नववर्षात जेलवारी घडू शकते.. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे...