Omicron : ओमायक्रॉनचा धोका पाहता नवी मुंबईतील 100 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यास मनपा सज्ज

Continues below advertisement

ओमायक्रॉनचा धोका पाहता ओमायक्रॉनचा प्रसार होण्यापूर्वी नवी मुंबईतील 100 टक्के नागरिकांचे दुसरा डोसचे लसीकरण या महिन्यातच पूर्ण व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कंबर कासलीय. याकरिता शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, चौक, रेल्वे स्थानक आणि बस स्थानका मध्ये अँब्युलन्स आणि बस उभ्या करून कोरोना लस दिल्या जाताहेत. नागरिक ही या मोहिमेचा लाभ घेताना दिसताहेत. मात्र जी लोकं दोनदा फोन करूनही लस घेण्यासाठी येत नाही अश्या लोकांच्या घरी जाऊन लस दिली जातेय. जेणेकरून शहरातील 70 टक्के नागरिकांनी लस घेतलीय. मात्र उर्वरित 30 टक्के नागरिकांचे ही लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram