Navi Mumbai Airport Name Row : 24 जून रोजी सिडको कार्यालयाला घेराव आंदोलन

Continues below advertisement

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळेच वळण लागले आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून आम्ही त्यांच्याशी सहमत नसल्याचे मत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मांडले आहे. दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.

मुंबईमध्ये असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत शिफ्ट होणार नाही. यामुळेच सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला. सरकार जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार असले, तर याला प्रकल्पग्रस्त आगरी कोळी जनतेचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. यासाठी येत्या 24 जून रोजी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून 1 लाखांवर जनता सहभागी होणार असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरवणार असतील तर याला प्रकल्पग्रस्त जनता तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायांचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram