Sharad Pawar : राजधानी दिल्लीत उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची सर्वात मोठी बैठक!

Continues below advertisement

नवी दिल्ली :  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते पवारांच्या घरी एकवटत आहेत.. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.

उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील.  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत..पण पश्चिम बंगाल मध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का याबाबत या हालचाली सुरू आहेत.. उद्याच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.

मार्च महिन्यात संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर पवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्लीत आले. मधल्या काळात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम मंदावले होते.. पण आज दिल्लीत आल्यानंतर ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एकीकडे काँग्रेसला अजून पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने यूपीएच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त होतात... त्यात पवारांची ही खेळी काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी निर्माण करणार का हे पाहावे लागेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram