Jan Ashirwad Yatra: उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत: Narayan Rane Speech
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईत विमानतळापासून सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा प्रारंभ करणाऱ्या राणेंनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. थोड्याच वेळात राणे 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजे वांद्र्यात दाखल होणार आहेत. तिथं राणेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. राणे आज शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावरही अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचा विरोध नाही असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. तरीही पोलिसांनी याठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai BJP Matoshree Shivaji Park Narayan Rane Jan Ashirwad Yatra BJP Narayan Rane Speech Bandra Shivsena