Narayan Rane Admitted In Lilavati Hospital : केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल
Continues below advertisement
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
70 वर्षीय नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांची एन्जिओग्राफी केली. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करुन, एक स्टेन टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आज आणि उद्या रुग्णालयात ठेवलं जाईल अशी शक्यता आहे. नारायण राणे त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही त्रास नाही.
Continues below advertisement