वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा साजरी! पारंपरिक वेशभूषेत दिसले कोळी बांधव
समुद्रकाठी राहणाऱ्या त्याचसोबत प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांसाठी नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण मानला जातो. ह्याचदिवशी समुद्रात नारळ सोडून मासेमारी सुरु केली जाते. वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांकडून बोटींची पूजा केली गेली. बोटींना पताका लावण्यात आल्यात. छान रंगरंगोटी करुन बोटी सजवण्यात आल्यात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ देखील समुद्राला अर्पण करण्यात आलेत. त्याचसोबत पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधवांनी यावेळी आपला सहभाग नोंदवला होता. त्याचसोबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील समुद्राला यावेळी नारळ अर्पण केला.