'ते' सोबत राहून पाठीत सुरा खुपसतायत, पुण्याचा पालकमंत्री काँग्रेसचा होईल अशी शपथ घ्या : नाना पटोले
Continues below advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. तसा पुनरुच्चार पुण्याच्या लोणावळ्यात काल पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कामाला लागायच्या सूचना दिल्या. मी बोललो तेंव्हा त्रास झाला, आता ते बोलले तर ठीक आहे. अशी सूचक टिपणी करताना मी स्वबळावर जे बोललो त्यावरून मी वापस येणार नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत, अशी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ज्यांना समजोता करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचं असेल त्यांना आपण काही बोलायचं नाही. पण तो राग आपली ताकद बनवा आणि पुण्यात आपला पालकमंत्री होईल अशी शपथ घ्या, असं आवाहन पटोले यांनी केलं.
Continues below advertisement