मुंबईत महागाई विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना बैलगाडी मोडल्याने फजिती, भाजपकडून खोचक टीका
Continues below advertisement
मुंबई : इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज (शनिवार 10 जुलै) काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या मोर्चाची फजित उडालेली पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकं होती. यामुळे वजनाने बैलगाडी मोडल्याने अपघात झाला. या बैलगाडी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः भाई जगताप देखील होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलांनाही जखम झाली आहे. या घटनेनंतर भाजपकडून सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Mumbai Mumbai Congress Maharashtra Congress Bhai Jagtap Congress Protest Bullock Cart