Congress Meeting : काँग्रेसच्या बैठकीला राज्यातील बडे नेते गैरहजर, नाना पटोलेंनी सांगितलं कारण

Continues below advertisement

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार गैरहजर राहिले. त्यामुळं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे,अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत, आणि रणजित कांबळे अनुपस्थित होते. तर या बैठकीत राहुल गांधी यांनाच पुन्हा काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा ठराव देखील मंजूर करण्यात आला.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram