Nalasopara : धाणीवबागमध्ये पार्किंगमध्ये उभा असलेल्या वाहनांना भीषण आग
नालासोपाऱ्यातील धाणीवबागमध्ये पार्किंगमध्ये उभा असलेल्या वाहनांना भीषण आग लागलीय. आगीत सात ते आठ मालवाहतूक करणारे ट्रक-टेम्पो जळून खाक झालेत. या आगीत कोणतीही जीवितनाही झाली नाही. परंतु मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. केमिकल असलेल्या ट्रकला आग लागल्याने मोठे स्फोट झाले. या स्फोटामुळे परिसरातील घरांनाही फटका बसलाय. आजूबाजूच्या घरांच्या काचाही तुटल्या आहेत. आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलंय. ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.