Nalasopara Rain : नालासोपारामधील सखल भागात साचलं पाणी, मागील 4 दिवसांपासून शहरातील मुख्य रस्ते जलमय
Continues below advertisement
वसई-विरारच्या नालासोपारा शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. आजही सकाळपासून वसई-विरार क्षेञात पाऊस सुरु आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचलंय. मागील चार दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. आजही तीच परिस्थिती आहे. लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरलं आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. नालासोपारा पूर्वेकडून स्टेशन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी
Continues below advertisement