MVA Seat Sharing : मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत EXCLUSIVE माहिती, 6 जागांवरून रस्सीखेचीची शक्यता

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन पक्ष असल्याने जागावाटप कसे होणार, याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. एकीकडे भाजपकडून पितृपक्षानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत (MVA seat Sharing) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार गणेशोत्सव (Ganesh Utsav 2024) संपल्यानंतर मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांवरुन जागावाटपाचे घोडे अडले आहे. हा तिढा  महाविकास आघाडी गणेशोत्सवानंतर सोडवेल, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही आहे. 

महाविकास आघाडीतील  काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सहा जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील तीन जागांसाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यामध्ये कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola