MVA Mumbai Mashal Morcha : 11 एप्रिलला मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा : सूत्र
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेनंतर महाविकास आघाडी आता मुंबईत वज्रमूठ आवळणार आहे... मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये.. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे... काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.. येत्या ११ एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
Continues below advertisement