Kolhapur Meat | कोल्हापुरातील मटणाच्या दरावर अखेर तोडगा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मटणाचे दर वाढल्याने अस्वस्थ असलेल्या कोल्हापूरकरांनी आज सुटकेचा निश्वास सोडला. आज झालेल्या बैठकीत मटणाला 480 रूपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केला. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर आज तोडगा निघाला. शिवाजी पेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली.