Muslim Family Ganpati :अलिगढमध्ये मुस्लिम कुटुंबाकडून गणपतीची प्रतिष्ठापना,मौलवींंनी जाहिर केला फतवा

Continues below advertisement

उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने गणपतीची प्रतिष्ठापना केल्याविरोधात स्थानिक मौलवींनी कुटुंबाविरोधात फतवा काढलालाय. भाजप पदाधिकारी रूबी आसिफ खान यांच्या विरोधात हा फतवा निघालेला आहे... मात्र रूबी यांचं कुटुंब विविध हिंदू सणांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतं... यंदा गणेशाची स्थापना केल्यानं मौलवींनी व्हिडीओद्वारे फतवा जारी करत इस्लाम  फक्त  अल्लाहची प्रार्थना करण्याची परवानगी देतं, याविरोधात कोणी असेल तर ते धर्माविरोधात असलेलं म्हटलंय. मात्र आपण कोणताही जात-धर्म मानत नसल्याचं रूबी यांनी म्हटलंय. तसंच असे फतवे काढणाऱ्यांना धर्मगुरू मानत नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram