COVID-19 in Mumbai | मुंबईकरांसाठी दिलसादायक बातमी; रुग्ण दुप्पटीच्या कालावधीत 15 दिवसांची वाढ
मुंबईत गेल्या 24 तासात 5542 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8478 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाक 37 हजार 711 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 86 टक्के आहे. सध्या 75 हजार 740 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 58 दिवस आहे.