Salim Shaikh | दादर स्टेशनवर बासरी वाजवणाऱ्या सलीम शेखच्या मंजुळ स्वरांचे मुंबईकर चाहते | ABP Majha
नोकरी व्यवसाय आणि कामानिमित्ताने दररोज हजारो मुंबईकर दादर स्टेशनवरुन ये-जा करत असतात. यावेळी गडबडीत असणाऱ्या मुंबईकरांच्या कानावर पडतात ते सलीम शेखच्या बसुरीतील मंजुळ स्वर. कितीही गडबड असली तरी आपले हात पाकिटामध्ये जाऊन त्यातले पाच, दहा रुपये मुंबईकर हळूच बाहेर काढतो आणि सलीमच्या खिशात ठेवून पुढे निघून जातो. सलीम मुंबईकरांना हवाहवासा वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा सलीम शेख?