Electronic AC Double Decker Bus : आजपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस
मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने एक गारेगार गिफ्ट दिलंय.. आज सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली. प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. दरम्यान या इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी