Mumbai : मुंबईत पावसाळा आणि हिवाळाही! पावसाबरोबर थंडी, मुंबईकरांनो स्वेटरबरोबर छत्रीही घ्या
Continues below advertisement
कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकर पावसाबरोबरच थंडीचा अनुभवही घेतायत. त्यामुळे एकाचवेळी स्वेटर आणि छत्री वापरण्याची वेळ मुंबईकरांवर आलीय. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झालीय. त्याचवेळी एका दिवसात मुंबईत तापमानाचा पारा तब्बल ९ अंशांनी घसरलाय. मंगळवारी तापमान ३३.३ अंश सेल्सिअस होतं. ते बुधवारी २४.८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. त्यातच मुंबईत आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Continues below advertisement