Mumbai Water Shortage : मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती, 1 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

Continues below advertisement

मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ५.४२ टक्के इतकाच साठा आहे.येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार साऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. १ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरुच आहे.

मुंबई, ठाण्यात पाऊस पाच दिवस सुट्टीवर;

मुंबई : यंदा दोन दिवस लवकर दाखल झालेल्या मान्सूनचा मुंबईतील जोर कमी झाला आहे. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे जिह्यात पुढील पाच दिवस पाऊस गायब असणार आहे. या अवधीत तापमानात पुन्हा 34 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात 21 जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाण्यात पाऊस पाच दिवस सुट्टीवर

राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासू दांडी मारली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायव झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस पुढील पाच दिवस सुट्टीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram