Mumbai Water Shortage : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मंगळवारी आणि बुधवारी पाणीकपात

Continues below advertisement

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात उद्या आणि परवा आंशिक कपात करण्यात येणार आहे. १८ आणि १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्क्यांची कपात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरात मिळून दररोज ३८५ कोटी लीटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या पाणीपुरवठा यंत्रणेच्या तांत्रिक श्रृंखलेत पिसे येथील बंधाऱ्याची महत्त्वाची भूमिका असते. पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाचं सध्या काम सुरु आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळं मुंबई महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram