Mumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

Continues below advertisement

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. तूर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीत अडसर ठरण्याची चिन्हे आहेत.

महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून मुंबईकरांना प्रतिदिन ३९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तत्पूर्वी धरणांमधून वाहून आणलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर जलवाहिन्यांमधून मुंबईकरांच्या घरी पाणी पोहोचविले जाते. धरणांमधून मोठ्या मुख्य जलवाहिन्यांमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून आणणे, पाण्यावर शुद्धकरणाची प्रक्रिया करणे, घरोघरी पाणी पोहोचविणे आदी कामांसाठी महापालिकेला मोठा खर्च येतो. मुंबईमधील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, जलबोगद्यांची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती आदी कामांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. मुंबईकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून काही अंशी हा खर्च भागविण्यात येतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram