BMC Word : मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला आज सादर होणार? ABP Majha

Continues below advertisement

मुंबई महापालिकेत वॉर्ड संख्या वाढवण्याचा मार्ग काल हायकोर्टाच्या निर्णयानं मोकळा झालाय.  त्यानंतर वॉर्ड पुनर्रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे आज सादर केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत वॉर्डची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्या ९ वॉर्डांपैकी एक शहरात वाढणार आहे, तर पश्चिम उपनगरात ४ ते ५ आणि पूर्व उपनगरात ३ ते ४ वॉर्ड वाढवले जाणार आहेत. मुंबईत शहरात नाना चौक परिसरात एक वॉर्ड वाढेल, तर पश्चिम उपनगरात बांद्रा, अंधेरी आणि बोरीवलीत वॉर्डची संख्या वाढणार आहे. पूर्व उपनगरात मानखुर्द आणि मुलुंड भागात वॉर्डची संख्या वाढणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram