Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 18 जानेवारी 2022 : मंगळवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 

1. ओबीसी आरक्षण हटल्यानंतर खुल्या झालेल्या जागांसाठी आज निवडणूक, 30 जिल्ह्यातील 93 नगरपंचायतींच्या 336 जागा तर जिल्हा परिषदेच्या 23 जागांसाठी आज मतदान  

2. मोदींबद्दल नाना पटोलेंच्या व्हायरल वक्तव्याचे राजकीय पडसाद, पटोलेंना अटक करण्याची नितीन गडकरी यांची मागणी

3. एसटी महामंडळाचा संप बेकायदेशीर, वांद्रे कामगार न्यायालयाचा निर्णय, 6 आठवडे आधी संपाची नोटीस न दिल्याचा निर्वाळा

4. 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशी की जन्मठेप?, गावित बहिणींकडून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज निर्णय अपेक्षित

5.  महाराष्ट्रातील शोषितांचा आधारवड हरपला, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन.डी. पाटील यांचं निधन, आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

6. सोलापूर जिल्ह्यात अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारा विशाल फटे पोलिसांना शरण, आज न्यायलयासमोर हजर करणार, कारवाईकडे गुंतवणूकदारांचं लक्ष

7. मुंबईत सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट; काल दिवसभरात पाच हजार 956 नागरिक पॉझिटिव्ह 

8. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं शाळा पुन्हा सुरु होण्याची शक्यता; पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत चर्चा होणार

9. पवई तलावाची पुन्हा जुन्या हार्वेस्टर पद्धतीनच स्वच्छता; ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करून जलपर्णी हटवण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध

10. अबुधाबी विमानतळ परिसरात ड्रोन हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, काही ऑईल टँकरही जळून खाक झाल्याची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola