Virus in Water | विषाणूपासून आरोग्याला धोका नाही | ABP Majha
मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे, शहरातल्या जलाशयांमध्ये एक महाकाय(व्हायरस)विषाणू आढळलाय. आयआयटी मुंबईच्या बायोसायन्स विभागातील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी हा व्हायरस शोधलाय. मुंबईतल्या पवई तलावांत तसंच, कुर्ला, वांद्रे याठिकाणीही हा विषाणू आढळून आलाय. याला शास्त्रज्ञांनी वांद्रेमेगाव्हायरस, कुर्ला व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे, कुर्ला व्हायरस, पवई लेक व्हायरस अशी नावे दिली आहेत.