Mumbai : ठाकरे गटाच्या वांद्रेतील अनधिकृत शाखेवर कारवाई करण्यापूर्वीचा व्हिडीओ

Continues below advertisement

आता आम्ही तुम्हाला व्हिडीओ दाखवतोय तो नीट पाहा. वांद्रे येथील शाखेवर कारवाई करण्यापूर्वीचा ठाकरे गटाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये महापालिका अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या अनधिकृत शाखेमध्ये असलेले विविध फोटो आम्ही काढतो असे सांगितलं.
मात्र स्वतः ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनाधिकृत शाखेवर तोडक कारवाई करण्यापूर्वी हे फोटो आम्ही काढून घेतो, थोडासा वेळ द्यावा असं सांगितलं. त्यावर मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी हे सर्व फोटो काढण्यासाठी वेळ दिला आणि त्यानंतर तोडक कारवाई केली
आता ठाकरे गटाकडून असा दावा केला जातोय की, अनधिकृत शाखेवर शाखेमधील फोटो आणि मूर्ती न हटवता ही तोडक कारवाई केली. ठाकरे गटाच्या या दाव्या नंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram