MNS Adhivation | मुंबईभर राज ठाकरे आणि मनसेचे पोस्टर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | ABP Majha

अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या राजकारणाची कूस बदलू शकतात. कारण राज ठाकरेंचा पुढील अजेंडा भगवा आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचे नवीन ध्वज एबीपी माझाला मिळाले आहेत. मनसेनं निवडणूक आयोगाला दोन ध्वज पाठवले आहेत. एकावर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आहे तर दुसऱ्यावर शिवमुद्रा आहे. विशेष म्हणजे दोन्ही झेंड्यात फक्त आणि फक्त भगव्या रंगाला स्थान आहे. यापूर्वीच्या मनसेच्या झेंड्यात पाचरंग होते. एवढचं नाहीतर मनसेच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक हँडलवरुन मनसेचा झेंडा हटवण्यात आला असून फक्त पक्षाचं चिन्ह इंजिन वापरण्यात आलं आहे. तसेच, निवडणुकीसाठी मनसेकडून पक्षाचं चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार असून मागील काळात राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे शिवमुद्रा असलेला झेंडा शिवजयंती, महाराष्ट्र दिन व अन्य मराठी सणांमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola