Online education | आजपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात; शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे यंदा शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांसह नाही तर यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. असं असलं तिरीही अद्याप शिक्षण विभागाकडून कोणत्याही सुचना किंवा गाइडलाइन्स जारी करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष कसं सुरु करायचं? हा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्यासमोर उभा राहिला आहे.