ABP News

School Bag Weight | पहिली ते सातवीसाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न | ABP Majha

Continues below advertisement
विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करण्यासाठी शिक्षण विभाग नवा प्रयोग करणार आहे. पहिली ते सातवी पर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तीन महिन्यांमध्ये शिकवणं अपेक्षित असलेला अभ्यासक्रम एक किंवा दोन पुस्तकांमध्ये देण्यात येणार आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा अतिरिक्त संच शाळेत ठेवतात. मात्र, शासकीय शाळांना प्रत्येक वेळी ते परवडणारं नाही. त्यामुळे
आता प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सुरूवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram