Mumbai Vaccination : मुंबईत आज लेडिज स्पेशल लसीकरण; महापालिकेचा विशेष उपक्रम

Continues below advertisement

Mumbai Vaccination : मुंबईत राहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवलं जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram