Balasaheb Thackeray Birth Anniversary | शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा बाळासाहेबांची उणीव भासली - उर्मिला मातोंडकर
बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर अनेक नेतेमंडळी आणि शिवसैनिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राजकीय वर्तुळात आदराचं स्थान असणाऱ्या आणि प्रत्येकाच्या मनात असणाऱ्या या नेत्याला आज सर्वांनीत अभिवादन केलं. नव्यानं शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकरही यात मागे नव्हत्या.