Mumbai Unseasonal Rain : मुंबईसह उपनगरात अवकाळी पाऊस; कामावर जाणाऱ्यांची तारांबळ
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 07:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Mumbai Rain Updates: राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. मुंबईतही (Mumbai Rain Update) पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अचानक कोसळणाऱ्या अवकाळीच्या सरींमुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. राज्यभरात झालेल्या अवकाळीमुळे 25 जिल्ह्यांतील एक लाख 39 हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं आहे.