Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.