MU Final Year Exams: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेसाठी पॅटर्न जाहीर, अशी होणार परीक्षा
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई विद्यापीठाने आपला अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात पॅटर्न जाहीर केला असून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी खास महाविद्यालयांचे क्लस्टर तयार केले असून प्रत्येक क्लस्टरमध्ये एक महाविद्यालय लीड करणार आहे. हे लीड महाविद्यालय त्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या परीक्षेची निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे परीक्षा घेण्याची जबाबदारी पार पडणार आहे. म्हणजेच विद्यापीठांनी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाविद्यालयावर टाकली आहे.