Admission in Mumbai University : मुंबई विद्यापीठात आता वर्षातून दोनदा प्रवेश : ABP Majha
मुंबई विद्यापीठात आता वर्षातून दोन वेळा प्रवेश मिळणार, परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवानगी, २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार, यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांची माहिती. परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असून, जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविल्या जातील, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली. भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्यास त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांस झालेला उशीर, आरोग्य समस्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना जुलै- ऑगस्टच्या सत्रात विद्यापीठात प्रवेश फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेता येईल. घेता आला नाही, त्यांना जानेवारी- द्विवार्षिक प्रवेशामुळे महाविद्यालयांना मनुष्यबळ, साधनसामग्रीचे नियोजन करता येईल. विविध विद्याशाखा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहायक सेवा अधिक कार्यक्षमतेने देता येईल, परिणामी, विद्यापीठात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल, असे कुमार म्हणाले.