CAA, NRC आणि NPR विरोधात आदिवासी समाजाचा मुंबईतील आझाद मैदानात निषेध
Continues below advertisement
मुंबईतल्या आझाद मैदानात आज आदिवासी समाजातल्या नागरिकांनी आज एनआरसी, एनपीआर आणि सीएए कायद्यांविरोधात आंदोलन केलं. त्य़ावेळी मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यातूनही आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. देशातील आदिवासी, भटके विमुक्त, भूमिहीन शेतमजूर, देवदासी, वाघ्या-मुरळी यांच्यासह सर्व धर्मातील दलित-ओबीसी वाईट परिस्थितीत जगत आहेत. या नागरिकांकडे कायदेशीर अस्तित्त्व सिद्ध करणारी कागदपत्रं असणं अशक्य आहे. त्यामुळं एनआरसी, एनपीआर, सीएए तसंच ईव्हीएमविरोधात राज्य शासनानं विधानसभेत ठराव मंजूर करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली. याबाबत आंदोलक लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
Continues below advertisement