Mumbai Thane Nagpur Pune शहरात घरं महागण्याची चिन्हं,नव्या घरांवर 1% Metro Surcharge लागणार
Continues below advertisement
कोरोना काळात विविध अधिभारांना स्थगिती दिल्यामुळे काहीशी आवाक्यात राहिलेली घरखरेदी नव्या आर्थिक वर्षात महागण्याची चिन्हं आहेत. विशेषतः ज्या शहरात मेट्रो सुरू होतेय त्या शहरात घरांवर एक टक्का मेट्रो अधिभार लागण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी हा अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आक्षेप घेतल्यानंतर सरकारनं या प्रस्तावाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. ही स्थगितीची अंमलबजावणी पुढे सुरू राहिली नाही तर हा अधिभार घरांवर लागणार आहे. त्यामुळे 31 मार्च नंतर मुंबई शहरात सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि इतर शहरांमध्ये सात टक्के मुद्रांक शुल्क होणार.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Thane Pune Marathi News ABP Maza Nagpur Metro Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv