Mumbai Thane Corona : मास्क वापरा, घाबरू नका; मुंबई आणि ठाणे पालिका कोरोनाविरोधात लढण्यासाठी सज्ज

Continues below advertisement

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवल्यानंतर आता केंद्र सरकारने सावध पावलं उचलली आहे. मुंबईतदेखील  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेनं लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे. तसंच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आजपासून मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची २ टक्के  'आरटीपीसीआर' चाचणी केली जाणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram