Mumbai Cold | मुंबईत पारा घसरला, थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार | ABP Majha
मागील 2-3 दिवसांपासून मुंबईतील तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत आहे. आज मुंबईत किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान आज मुंबईत नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईकरही आज हुडहुडी अनुभवत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला आहे. तर, अनेकांनी आपले ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर काढले आहेत.