Mumbai : जालन्यातील घटनेसंदर्भात ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनमध्ये
ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये पोहोचलेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला संदर्भात ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे, अनिल परब, अजय चौधरी, रमेश कोरगावकर, सचिन अहिर, विलास पोतनीस राज्यपालांना भेटणार आहेत.