Mumbai Climate : मुंबई गारठली, किमान तापमानात घट; उत्तरेतील बर्फवृष्टीमुळे गारवा

Continues below advertisement

Mumbai Climate : मुंबई गारठली, किमान तापमानात घट; उत्तरेतील बर्फवृष्टीमुळे गारवा मुंबईत गारवा वाढला.,.पारा 17 पर्यंत घसरला, उत्तरेकडील थंड हवेमुळे वाढला गारठा   उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी होत असून तेथून येणाऱया बोचऱया वाऱयांमुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. दोन दिवसात मुंबईचे किमान तापमान 17 डीग्री सेल्सियसपर्यंत तर कमाल तापमान 28 डीग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे. राज्यभरातही अनेक ठिकाणी किमान पारा 12 ते 14 पर्यंत घसरल्याची नोंद सोमवारी झाली. शनिवार आणि रविवारीही हुडहुडी भरवणारी थंडी पडली होती.  पुढचे तीन दिवस थंडीचेच  गायब झालेली थंडी पुन्हा पडली असून पुढचे दोन दिवस म्हणजेच 7 मार्चपर्यंत मुंबईसह राज्यभरात विविध भागात बोचरी थंडी असेल असे राज्याच्या कृषी हवामान विभागाचे माजी संचालक आणि हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. 8 तारखेपासून मात्र पारा पुन्हा चढेल आणि कडक उन्हाळा सुरू होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram