Mumbai Temperature : यंदाच्या मौसमात मुंबईतील तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज

मुंबईतल्या दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात किंचित बदल झाला. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क ४० अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल ३९.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही काल कमाल तापमान ३७ अंश सेल्सियसवर पोहोचलं होतं. दरम्यान, सांताक्रूझ हवामान केंद्रावर शनिवार आणि रविवारी अनुक्रमे ३७ अंश आणि ३८.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola