Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 28 Sep 2024

Mumbai Superfats News :  मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 28 Sep 2024

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल, गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल...केंद्रीय निवडणूक आयोगचं कडक धोरण...

निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्युचं प्रकरण चर्चेत, इंजेक्शन दिल्यामुळं अटॅक आल्याचा अनेकांना संशय, संजय शिरसाटांचं वक्तव्य...पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार, केदार दिघेंचं प्रत्युत्तर...

'लाडकी बहीण'साठी खर्च केल्यावर  पगारालाही पैसे उरणार नाहीत अशी राज ठाकरेंची टीका, शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता असाही सवाल...

सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी, रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुकसोहळा...

संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंग राजपूत, राजू शिंदे आणि दिशेन परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता, सूत्रांनी दिली एबीपी माझाला माहिती..

कागलची लढाई निष्ठा विरूद्ध निष्ठेचे सौदागर, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह चर्चेत समरजीतसिंह घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा

माझं संतुलन बिघडलंय म्हणता तर मग नार्को टेस्ट कशासाठी, एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola