Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या मंत्रालयासमोर एक दिवसीय आंदोलन , थकीत बिलांसाठी आंदोलन, जवळपास ३ लाख कंत्राटदारांचे 40 हजार कोटी थकले. 

मुंबईतील आशा वर्कर्सचे उद्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन, दिवाळी बोनस आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याची माहिती  

सुधाकर शिंदे समितीचा अहवाल मंत्रालयात सादर, शिंदेंच्या ९ जणांच्या समितीने ९ महिने ५ राज्यात जाऊन धनगर आरक्षणसंदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याची माहिती.

वांद्रे शासकीय वसाहतीमधील रहिवाशांचं आमरण उपोषण सुरु, आदित्य ठाकरेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट, आंदोलकांची मागणी योग्यच, त्यांना मालकी हक्काची घरं मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. 

मुलींना चुकीच्या पद्धतीने मेसेज करणाऱ्याला मनसेचा चोप, कामोठेमधली घटना, संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 

चेंबूरमधील आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गुप्ता कुटुंबाच्या घरात चोरी,  आग विझवण्यासाठी आलेल्या काही अज्ञातांनी मारला तिजोरीवर डल्ला, लाखोंची रोकड आणि १०० ग्रॅम सोनं चोरीला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram