Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होती. दरम्यान रामराजेंसोबत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली होती

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांना फोनवरुन  उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तेच दीपक चव्हाण अजित पवारांची साथ सोडणार आहेत. मात्र, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाली नसल्याने उमेदवारीचं काही ठरलं नाही, असं दीपक चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

रामराजे निंबाळकरांसोबत दीपक चव्हाणही तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते रामराजे निंबाळकर यांनी साताऱ्यात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राजराजे निंबाळकर यांच्याशी जवळीक असलेले फलटणचे दीपक चव्हाण देखील याच मेळाव्यातून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात चांगले वातावरण आहे, त्यामुळे अनेक तुतारीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram