Mumbai South Central Lok Sabha : दक्षिण मध्य मुंबईची जागा कोण जिंकणार? जनता काय म्हणते ऐका!
Continues below advertisement
Mumbai South Central Lok Sabha : दक्षिण मध्य मुंबईची जागा कोण जिंकणार? जनता काय म्हणते ऐका!
South-Central Mumbai Lok Sabha Constituency : मुंबई : मुंबई (Mumbai News) म्हणजे, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आपल्यात सामावून घेणारी स्वप्नांची नगरी. देशभरातून अनेकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. तसं पाहायला गेलं, तर संपूर्ण मुंबई शहरच कष्टकऱ्यांचं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातल्या त्यात मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ (South-Central Mumbai Constituency) म्हणजे, कष्टकरी वर्गाचा मतदारसंघ. अशा या मतदारसंघाला भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तसं पाहायला गेलं तर मुंबई शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला. पण साधारणतः दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीनंतर पक्ष दोन भागांत विभागला गेला. एक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पक्ष आणि दुसरा शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पक्ष. पुढे शिवसेना आणि धनुष्यबाणावरुन दोन्ही गटांत अस्तित्वाची लढाई झाली आणि अखेर न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेंच्या पारड्यात पडला, तर ठाकरेंना नवं चिन्ह आणि नवं नाव घ्यावं लागलं. पुढे शिंदेंनी भाजपच्या साथीनं राज्यात सरकार स्थापन केलं आणि ठाकरेंनी महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला आणि नव्यानं पक्षबांधणीला सुरुवात केली. आता बंडानंतर पहिली लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे आमने-सामने येणार असून त्यांच्या निर्णय जनमतानं होणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक खऱ्या अर्थानं चुरशीची होणार आहे.
Continues below advertisement