Pune Baby Found | दोन महिन्याच्या बाळाला चर्चजवळ सोडून जोडपं पसार, मूल आपलं नसल्याचा पतीला संशय
पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला मुलगा आपल्यापासून झाला नसल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर या मुलाला सोडून दे असे सांगितले. आणि त्यानंतर या दोघा आई-बापांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्चजवळ कापडी पिशवीत गुंडाळून ठेवले आणि निघून गेले. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना पिशवीतले हे बाळ सापडलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन या बाळाच्या आई बाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता समोर आले हे धक्कादायक सत्य.